गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Facebook Comments Box
Vision Abroad