Konkan Railway News: मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी देशातील इतर पाच गाड्यांबरोबर या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती समोर आली आहे. या आधी मुंबई ते मडगाव वंदे भारत कोकण रेल्वे मार्गावर चालत आहे. मडगाव – मंगळुरु सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर वंदे भारत या प्रीमियम गाडीची सेवा दक्षिणेच्या मंगळुरु स्थानकापर्यंत विस्तारित होणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या पलक्कड विभागाने या बातमीची पुष्टी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुण कुमार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने मंगळुरू सेंट्रल येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उदघाटनासाठी विस्तृत तयारी केली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,ज्याची विभागाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही आहे, ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचेल, परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून संध्याकाळी 6.10 वाजता सुटून, मंगळुरु सेंट्रलला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. या गाडीला दोन्ही स्थानकामध्ये फक्त उडपी आणि कारवार येथे थांबे असतील.
कनेक्टेड सेवेचा लाभ
मडगाव साठी ही गाडी मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १.०५ वाजता मडगावला पोहोचणार आहे. सध्याच्या २२२३० मडगाव – मुंबई या गाडीची मडगाव वरून मुंबईसाठी निघण्याची वेळ दुपारी १४:४० अशी आहे. त्यामुळे मंगुळुरु येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक सोयीची कनेक्टेड सेवा उपलब्ध होणार आहे. वेळेमध्ये काहीसा बदल केल्यास मुंबई ते मंगुळुरु साठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी एक कनेक्टेड सेवेचा पर्याय बनू शकते.
Facebook Comments Box
Vision Abroad