रत्नागिरी :देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय संग्रहालय गणपतीपुळे जवळील मालगुंड मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली आहे. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांच्या वाढदिवसाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली उपस्थिती दाखवली होती यावेळी ते बोलत होते.
या प्राणिसंग्रहालयाची जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Tourism | येथे समुद्र अंधारात चमकतो, कोकणातील 'या' बीचला भेट देऊन अनुभवा निसर्गाचा अविष्कार
कोकण
Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभिय...
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार - मंत्री नितेश राणे
कोकण