Konkan Railway News , ०६/०३/२०२४: शिगमोत्सव म्हणजे गणेश चतुर्थी नंतर कोकणात साजरा केला जाणार मोठा सण. हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आपल्या घरी जातात. या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासन विशेष गाड्या चालवते. यंदाही होळी सणाकरिता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn. – Madgaon Jn. – Ahmedabad Jn. Special on Special Fare (Weekly) :
ही गाडी अहमदाबाद आणि मडगाव या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09412 Ahmedabad Jn. – Madgaon Jn. Special on Special Fare (Weekly):
दिनांक १९/०३/२०२४ आणि २६/०३/२०२४ मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी ०९:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:३० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 Madgaon Jn. – Ahmedabad Jn. Special on Special Fare (Weekly)
दिनांक २०/०३/२०२४ आणि २७/०३/२०२४ बुधवारी ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी ०८:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी
डब्यांची संरचना
एसएलआर – टू टायर एसी – ०१+ थ्री टायर एसी – ०३ + सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४, एसएलआर – ०२
आरक्षण
या गाडीचे आरक्षण ०८/०३/२०२४ पासून सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.inga या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box