Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्ग हा कोकणवासियांचे अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. १३/१४ वर्षे रखडलेला हा महामार्ग पूर्ण होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यात महामार्गाचे करण्यात येत असणारे सुमार काम आणि घेतली जाणारा निष्काळजीपणाची स्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी केलेल्या चुकांमुळे ती ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. जनआक्रोश समितीचे अजय यादव यांनी परशुराम घाटातील असाच एक स्पॉट जिथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तो समाज माध्यमाच्या साहाय्याने निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट नुसार ते म्हणत आहेत ….
कोकण हायवेवर अपघात का होत आहेत अथवा कसा होवू शकतो याचा अतिशय उत्तम नमुना म्हणजे हा खतरनाक स्पॉट परशुराम घाटात… राम भरोसे कारभार! घाट उतरताना एका ब्लाइंड स्पॉटवरच चक्क डायवर्जन दिलं आहे. काय विचार करून ही लोक काम करत आहेत? लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.परशुराम घाटात गाडी सांभाळून चालवा खासकरून घाट उतरताना… Diversion चे क्लिअर सूचना देणारे कोणतही फलक नसल्याने अश्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आपणच काळजी घ्या भावांनो…या संदर्भात पुढे जावून मी पोलिसांच्या चौकीवर ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्वरित मान्य करून त्या संबंधित कल्याण टोल कॉन्ट्रॅक्टरचा माणूस ला फोन लावून माझ्याशी बोलणे करून दिले. मी त्यांना सदर कल्पना दिली. यावर त्यांनी हे काम माझ्या अखत्यारीत येत नसून ईगल कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर सोबत बोला असे सांगितले. त्यांनी तसे केले आहे. आता यावर अधिक काय बोलावे मला सुचत नाही. पण याला तिथली प्रशासन व्यवस्था जबाबदार इतके मला कळले. तूर्तास तुम्ही या रस्त्याने जाणाऱ्या मंडळींनी काळजी घ्या. उद्या परत चेक करतो काय परिस्थिती आहे. त्यानुसार काय ॲक्शन घेता येईल पाहतो…
Facebook Comments Box
Vision Abroad