Savarkar Contribution’s for Marathi Language : स्वात्रंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्याचे देश प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आताच्या प्रेक्षकवर्गाला चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना माहितीही नसेल ती म्हणजे त्यांचे मराठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले शेकडो शब्द.
सावरकरांनी दिलेले हे शब्द त्यांच्याकडून मरठी भाषेला दिलेलं एक गिफ्ट्च आहे..
कारण मराठी भाषेची व्याप्ती ही वेळीच वाढविणे खूप गरजेचे आहे हे सावरकरांनी आधीच ओळखले होते..त्यामुळे रोजच्या वापरात असे काही शब्द होते की जे उर्दू,हिंदी याची सरमिसळ असणारे शब्द होते.. त्यामुळे मराठी भाषेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्या भाषेला साजेशी अशी शब्दरचना असायला हवी ही सावरकरांची इचछा होती.
सर्वसामान्य माणसाच्या संवादाचे माध्यम असणारी आपली ही सुंदर भाषा जर त्याच शैलीत बोलल्या गेली नाही तर त्याचे सौंदर्य हे खुलत नाही असे सावरकरांचे म्हणणे होते..अनेक इंग्रजी शब्द आपण आजही मराठी भाषेत वापरतो हे सावरकरांना मान्य नव्हतं.. आणि त्यातूनच त्यांनी अशी काही मराठी शब्दरचना केली की जी आजही आपण वापरतो..
- दिनांक (तारीख)
- क्रमांक (नंबर)
- बोलपट (टॉकी)
- नेपथ्य
- वेशभूषा (कॉश्च्युम)
- दिग्दर्शक (डायरेक्टर)
- चित्रपट (सिनेमा)
- मध्यंतर (इन्टर्व्हल)
- उपस्थित (हजर)
- प्रतिवृत्त (रिपोर्ट)
- नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
- महापालिका (कॉर्पोरेशन)
- महापौर (मेयर)
- पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
- विश्वस्त (ट्रस्टी)
- त्वर्य/त्वरित (अर्जंट)
- गणसंख्या (कोरम)
- स्तंभ ( कॉलम)
- मूल्य (किंमत)
- शुल्क (फी)
- हुतात्मा (शहीद)
- निर्बंध (कायदा)
- शिरगणती ( खानेसुमारी)
- विशेषांक (खास अंक)
- सार्वमत (प्लेबिसाइट)
- झरणी (फाऊन्टनपेन)
- नभोवाणी (रेडिओ)
- दूरदर्शन (टेलिव्हिजन)
- दूरध्वनी (टेलिफोन)
- ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
- विधिमंडळ ( असेम्ब्ली)
- अर्थसंकल्प (बजेट)
- क्रीडांगण (ग्राउंड)
- प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
- मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
- प्राध्यापक (प्रोफेसर)
- परीक्षक (एक्झामिनर)
- शस्त्रसंधी (सिसफायर)
- टपाल (पोस्ट)
- तारण (मॉर्गेज)
- संचलन (परेड)
- गतिमान
- नेतृत्व (लिडरशीप)
- सेवानिवृत्त (रिटायर)
- वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.
Facebook Comments Box