Konkan Railway: कोकणातील होळी सण पाच ते नऊ दिवसांपर्यंत साजरा होतो. अनेक ठिकाणी उद्या शनिवारी रंगपंचमी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते चिपळूण /रत्नागिरी या दरम्यान जाता येता या गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष चिपळूण येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी २०:५० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे येथे थांबेल.
२) गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष पनवेल येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी २१:०० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
वरील अनारक्षित स्पेशलची रचना: एकूण ८ मेमू डबे.
वरील ट्रेनच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad