सिंधुदुर्ग, दि. २६ एप्रिल:बळवली पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. या मार्गाच्या डीपीआरमध्ये सुधारणा केली जात असल्याची माहिती आहे, या पूर्वीच्या संरेखनाप्रमाणे हा महामार्ग सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ Eco-Sensitive झोनमधून जात होता. या कारणांमुळे या महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी समस्या निर्माण होणार असल्याने त्यात बदल करण्यात येणार आहे.
अलीकडेच उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला तळकोकणातील २५ गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे येथील भागातील वृक्षतोडीवर, जंगलतोडीवर मर्यादा येणार आहेत. या कारणांमुळे या महामार्गासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे कठीण जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर, शिवडी, मुंबई ते पणजी, गोवा असा प्रवास ६ तासांपेक्षा कमी वेळेत करता येणार आहे कारण अटल सेतू आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या एक्स्प्रेसवेशी अखंडपणे जोडले जाणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल. या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
Facebook Comments Box
Vision Abroad