Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे. मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.
लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
एक्झिट पोल एजन्सी | महायुती | महाविकास आघडी | इतर |
ABP News-CVoter | 24 | 23 | 1 |
TV9 पोलस्ट्राट | 22 | 25 | 1 |
Republic Bharat-Matrize | 30-36 | 13-19 | 0 |
Republic PMARQ | 29 | 19 | 0 |
News18 exit poll | 32-35 | 13-16 | 0 |
School of Politics | 31-35 | 42705 | 0 |
TIMES NOW Survey exit polls | 26 | 24 | 0 |
News 24 Chanakya exit polls report | 33 | 15 | 0 |
Rudra survey | 13 | 34 | 1 |
NDTV India – Jan Ki Baat | 34-41 | 42614 | 0 |
Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील?
Alliance / Party | NDA | INDIA | OTHERS |
ABP-C Voter | 353-383 | 152-182 | 04 -12 |
India Today- Axis My India | 361-401 | 131-166 | 08-20 |
News 18 | 355-370 | 125-140 | 42-52 |
TV9-Polstrat | 353-368 | 118-133 | 43-38 |
Today’s Chanakya | 385-415 | 96-118 | 27-45 |
NDTV-Poll Of Polls | 358 | 148 | 37 |
Republic-PMARQ | 359 | 154 | 30 |
News Nation | 342-378 | 153-169 | 21-23 |
India NewsDynamics | 371 | 125 | 47
|
Facebook Comments Box
Vision Abroad