Revas Reddy Coastal Highway Updateds: रेवस-रेड्डी कोस्टल हायवे बद्दल एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड (ABL) या कंपनीलाला शुक्रवारी कोकणातील जयगड आणि कुंडलिका नद्यांवर दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. अशोका बिल्डकॉन आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) या दोन्ही करारांसाठी आपल्या निविदा सादर केल्या होत्या.
जयगड खाडी पूल
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि सांडेलवगण यांना जोडणारा 2 लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
MSRDC चा अंदाज: रु. 625.87 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -794.85
HCC – 826.15
कुंडलिका खाडी पूल
3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल 2 लेनसह रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना जोडेल. या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही संबोधले जाते.
MSRDC चा अंदाज: रु. 1061.67 कोटी
पक्की बोली (रु. कोटी)
Ashoka -1357.87
HCC – 1422.64
अशोका बिल्डकॉन लिमिटेड ची बोली जयगड पुलासाठी 794.85 कोटी आणि रु. कुंडलिका पुलासाठी 1357.87 कोटी हे MSRDC च्या अंदाजापेक्षा 26.99% आणि 27.89% जास्त होते, त्यामुळे वाटाघाटी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
Facebook Comments Box
Vision Abroad