मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दि 7 जुलै 2024 पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने येथून सुटणार्या काही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. यात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 10, 11, 12, 13 या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे दिनांक 07 जुलै पर्यंत म्हणजे पुढील महिनाभरासाठी काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामामुळे मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (12134), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस(12052) या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक 07 जुलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपणार आहे
Facebook Comments Box
Vision Abroad