Mansoon Alert: महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंन्त मान्सून दाखल झाला असल्याने उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचसोबत तळ कोकणात उद्यापर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. कोकणसह संपूर्ण राज्यात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे.
हवामान खात्याचा अंदाज
उद्या शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याने राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. काही जिल्हे वगळता रविवारी आणि सोमवारी सुद्धा राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत या दिवशीं मुसळदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने या दिवशीं या जिल्ह्यांना दक्षतेचा ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.
Facebook Comments Box


