रत्नागिरी: न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड (NECPL) ला बुधवारी कोकणातील रत्नागिरी विमानतळावर (RTC) नवीन टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार Bidder म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या मालकीचे आहे आणि सध्या नजर ठेवण्यासाठी आणि शोध तसेच बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे एक स्टेशन आहे.महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (MADC) द्वारे आता 3200 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारत, लिंक टॅक्सीवे आणि दोन ATR-72 प्रकारची विमाने हाताळण्यास तजवीज करण्यात येत आहे. त्यासाठी MADC ने मार्च 2024 मध्ये नवीन टर्मिनल इमारत बांधकाम कामासाठी रु. 50.52 कोटी अंदाज आणि 540 दिवस (1.47 वर्ष) बांधकाम मुदतीसाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी आलेल्या ७ बोलीदारापैकी, फुलारी रियल्टी, नेश आर्किटेक्ट्स आणि एससीसी इन्फ्रास्ट्रक्चर या 3 कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अटींचे पालन करत नसल्याने त्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
इतर बोलीदारांनी लावलेल्या बोली खालीलप्रमाणे
न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड – ५७.६४ कोटी रुपये
हायटेक इन्फ्रा – ६०.२१ कोटी रुपये
जेनेरिक इंजिनीरिंग – ६३ .१५ कोटी रुपये
अजवानी इन्फ्रा – ६४.०० कोटी रुपये
NECPL अंदाजरकमेच्या 14.09% जास्त असल्याने करारासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बोलीदार आणि MADC मध्ये पुढील वाटाघाटी होणार आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad