



रत्नागिरी : या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यासाठी दिवा - दादर मार्गाची पाहणी करणार - मध्य रेल्वेकडून ...
कोकण
Ratnagiri ST Bus Accident: "काळ आला होता पण...'' प्रवाशांनी भरलेली एसटी बस धरणात पडता पडता वाचली
अपघात
सावंतवाडी: आता रेल रोको शिवाय पर्याय शिल्लक नाही..!! - रेल्वे प्रवासी संघटनेचा एकमुखी निर्धार.
कोकण