रत्नागिरी: चिपळूण खेड दापोली भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. यंत्रणा अलर्ट झाली असून अनेकजणांना सुरक्षितेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असून अनेक सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेसाठी काही जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर तिकडे गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Facebook Comments Box