समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
Follow us onचिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता
▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT
▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.
Vision Abroad