Goa News: आता गोव्यात घेता येणार ‘लक्झरी’ पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अलीकडेच गोव्यातील पहिल्या सुपर यॉट ‘RA11’ चे उद्घाटन पार पडले. भारताच्या प्रमुख सागरी क्लस्टरचा एक भाग म्हणून विकसित, ‘RA11’ लाँच केल्याने गोवा राज्य आता लक्झरी आणि नॉटिकल पर्यटन क्षेत्रात उत्तम सेवा पर्यटकांना देईल अशी अपेक्षा आपल्याला आहे असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.
गोवा MSME विजय मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तयार केलेल्या RA 11 सुपर यॉटचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले, हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी यॉट मेक इन इंडिया, मेक इन गोवा या संकल्पनेला मूर्त रूप देत असल्याचे त्यांचे मत आहे.
Facebook Comments Box