आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 16:06:51 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 07:52:49 पर्यंत, उत्तराभाद्रपद – 29:40:52 पर्यंत
- करण-विष्टि – 16:06:51 पर्यंत, भाव – 26:37:26 पर्यंत
- पक्ष-शुक्ल
- योग-हर्शण – 19:08:39 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय-06:46
- सूर्यास्त-17:59
- चन्द्र राशि-मीन
- चंद्रोदय-15:16:59
- चंद्रास्त-27:47:00
- ऋतु-हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
- १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
- १९२५: अमेरिका व इटली या दोन देशांनी आजच्याच दिवशी शांतता करारावर स्वाक्षरी केली होती.
- १९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
- १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- १९३६: केरळ येथील मंदिरे सर्व हिंदू धर्मियांकारिता खुले करण्यात आले होते.
- १९५६: आजच्याच दिवशी मोरक्को, सुदान आणि ट्युनिशिया हे देश संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेत समाविष्ट झाले होते.
- १९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९६७: आजच्याच दिवशी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.
- १९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
- १९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.
- २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.
- २०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
- २००३: ’शांघाय ट्रान्सरॅपिड’ या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- २०१५: आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशांत आतंकवादी हल्ल्यात ४३ जन मृत्यमुखी पडले होते ह्या हल्ल्याची जबाबदारी आई एस आई संघटनेने स्वीकारली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८१७: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)
- १८६६: चीन प्रजासत्ताक चे पहिले अध्यक्ष सन यट-सेन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९२५)
- १८८०: पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)
- १८८९: रीडर डायजेस्टचे सह्संथापक डेव्हिट वॅलेस यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)
- १८९६: डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (मृत्यू: २७ जुलै १९८७)
- १९०४: श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: १ एप्रिल १९८९)
- १९४०: अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८६१: महान स्वतंत्रता सेनानी व समाज सुधारक मदन मोहन मालवीय यांचा मृत्यू झाला होता.
- १९४६: पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)
- १९५९: केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (जन्म: ९ मे १८८६)
- १९५९: सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)
- १९६९: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)
- १९९७: वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी (जन्म: ? ? ????)
- २००५: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)
- २००७: भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१९)
- २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९४६)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad