आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 20:00:00 पर्यंत
- नक्षत्र-माघ – 19:28:02 पर्यंत
- करण-बालव – 07:00:26 पर्यंत, कौलव – 20:00:00 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-इंद्रा – 11:40:51 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:53:49
- सूर्यास्त- 17:57:08
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 25:03:00
- चंद्रास्त- 13:13:00
- ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १९२४: एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
- १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
- १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
- १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
- १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
- १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
- १७५५: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
- १८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
- १८९७: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
- १९२३: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: १६ आक्टोबर २००२)
- १९२६: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
- १९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (मृत्यू: २० जुलै १९७२)
- १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
- १९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
- १९८४: अमृता खानविलकर – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९३७: जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)
- १९५९: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (जन्म: १२ मार्च १८९१)
- १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
- १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
- १९९३: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
- १९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????
- २०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
- २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad