Sleeper Vande Bharat : पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा संभाव्य मार्ग जाहीर

   Follow us on        

Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.

पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.

यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –

1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.

3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.

4- EN मानकांच्या  अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.

5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.

6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि  ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.

7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.

8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.

9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search