आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 26:29:02 पर्यंत
- नक्षत्र-विशाखा – 20:29:05 पर्यंत
- करण-कौलव – 13:42:07 पर्यंत, तैतुल – 26:29:02 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-धृति – 22:36:08 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:12
- सूर्यास्त- 18:08
- चन्द्र-राशि-तुळ – 13:57:25 पर्यंत
- चंद्रोदय- 28:41:59
- चंद्रास्त- 15:03:59
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १८६१: पहिल्यांदा कोलकत्ता येथे चहा ची सार्वजनिक बोली पार पडली.
- १९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
- १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
- १९३४: पर्शिया च्या शाह ने पर्शिया चे नाव बदलवून इरान ठेवण्याची घोषणा केली.
- १९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
- १९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
- १९६६: जगातील सर्वात लांब गुफा “Cave of Swallows” चा शोध लागला.
- १९६८: चंद्राची परिक्रमा करणारे अपोलो-8 स्पेस एअर क्राफ्ट समुद्रात उतरविले.
- १९७२: उत्तर कोरिया मध्ये नवीन संविधान मंजूर झाले.
- १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
- १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
- २००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
- २००८: व्ही शांताराम पुरस्कार समारोहा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तारे ज़मीं पर ला पुरस्कार मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
- १६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
- १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
- १७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
- १८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
- १८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
- १९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
- १९३७: लोकसभेचे माजी सदस्य शंकर दयाल सिंह यांचा जन्म.
- १९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
- १९४२: परमवीर चक्र विजेता आणि देशाचे सैनिक अल्बर्ट एक्का यांचा जन्म.
- १९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
- १९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
- १९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
- १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
- १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
- १९७२: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २३ एप्रिल १८९७)
- १९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
- २००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
- २००३: ला भारतीय कवी के एस एस नरसिंहस्वामी यांचे निधन.
- २००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३)
- २०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad