Ratnagiri ST Bus Accident: “काळ आला होता पण…” प्रवाशांनी भरलेली एसटी बस धरणात पडता पडता वाचली

   Follow us on        

Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.

 

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search