गोवा वार्ता: केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
spacer height=”20px”]
शिवानी ही मित्रासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आली होती. पर्यटनाचा एक भाग म्हणून पॅराग्लायडिंग करावे, या हेतूने ती डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेली. त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने पॅराग्लायडरची एक दोरी मध्येच तुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेचा पंचनामा मांद्रे पोलिसांनी केला.
spacer height=”20px”]
बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय
हा पॅराग्लायडर शेखर रायजादा नामक व्यक्तीचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हरमल तसेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे सांगण्यात आले. येथील काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पॅराग्लायडिंगला आमचा विरोध असून तशा प्रकारचा ठराव मंजूर करूनही सरकारने अशा पॅराग्लायडिंग व्यवसायिकांना परवाने का दिले? कुणाला परवाने दिले? याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
spacer height=”20px”]
Facebook Comments Box
Vision Abroad