



ठाणे: कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तव २०२५ साठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान “धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस” गाडी सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल दिनांक २२ मार्च रोजी सुपूर्त केले.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे, हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासी यांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महोदय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. आपले सर्वतोपरी योगदान आणि समाजकार्यात मोठ्या प्रमाणात समाजसेवा घडवीत ठाण्यातील जनतेत आपले अढळ स्थान ठामपणे प्रखरतेने उमटवले होते ना आहेच ते न मिटण्यासारखे आहे. अशा थोर समाज सेवकास खरी आदरांजली देण्याकरिता गेली सतत तीन (३) वर्षे करीत असलेली मागणी ठाण्यातील लहानातल्या लहान संघटनेपासून राज्य पातळीवरील संघटना, कोकणवासिय, कोकण रेल्वे प्रवासी यांच्या जोरदार आणि प्रचंड मागणीनूसार कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि ठाणे संघटना आपणांकडे सदर विषयांतर्गत निवेदन सादर करीत या वर्षांतरी कोकण वासियांना “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस गाडी चा लाभ घेता येईल हीच अपेक्षा आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ हनुमंत निकम उपस्थित होते
यापूर्वीही कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)यांच्या वतीने खासदार नरेश मस्के, खासदार संजीव नाईक, मा. खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांना भेटून या मागणी संबधी निवेदने देण्यात आली आहेत. यावर्षी या मागणीचा विचार करण्यात येवून “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस यावर्षीच्या गणेशोत्सवात धावेल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.
तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी स्टेशन वर दिवसभर सायडिंगला उभी करून ठेऊन रेल्वे काय सध्या करू इच्छित आहे?? ती सकाळीच सफाई करून तिला मुंबई साठी परत पाठवा (pairing train)