Konkan Railway : मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्यान वास्को रेल्वे पोलिस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान रेल्वे फलाटावर गस्त घालीत असताना त्यांना एक लाल रंगाची बॅग बेवारस स्थितीत मिळाली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेली पांढऱ्या धातूची एक वस्तू दिसून आली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक सोनाराला पाचारण करून त्याच्यामार्फत त्या वस्तूची तपासणी केली. पडताळणीअंती ती वस्तू चांदीची छत्री (छत) असल्याचे सिध्द झाले. तिचे वजन १६.४ किलोग्रॅम होते. ८७.५० टक्के शुध्दता असलेल्या त्या छत्रीची किंमत अंदाजे ५ लाख ३७ हजार ६०० रुपये होते.
वास्को रेल्वे स्थानकावर मंगळवारी (ता.१५) सायंकाळी सापडलेली चांदीची छत्री ही कारवार येथील साईबाबा मंदिरातून संशयितांनी चोरल्याचे उघडकीस आले. कारवार पोलिसांनी बुधवारी (ता.१६) वास्कोला येऊन ती छत्री कायदेशीर सोपस्कारानंतर ताब्यात घेतली, असे वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
ही चांदीची छत्री (छत्र) कारवार येथील साईबाबा मंदिरात चोरी झालेल्या मुद्देमालापैकी एक असल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी त्या मंदिरातील सोळा किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या. त्यानंतर कदाचित ते वास्कोला आले असावेत. वास्को रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त त्याची चांदीची छत्री असलेली बॅग फलाटावर सोडून तेथून पळ काढला असावा , अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे .
Facebook Comments Box