मुंबई: उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. यानुसार, स्वयंचलित दरवाजे (Automatic Door Closure System) असलेले दोन नॉन-एसी लोकल ट्रेनचे रॅक (Wagons) कारखान्यात बांधणीच्या (Manufacturing) प्रक्रियेत आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी आणि प्रवासात होणारे अपघात टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे होणारे अपघात आणि प्रवासादरम्यान डब्याच्या दरवाज्यातून खाली पडण्याचे प्रकार यामुळे थांबतील.
या नवीन रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे, डिजिटल डिस्प्ले युनिट आणि दरवाजे बंद असताना व्हिज्युअली (दृश्यात्मक) आणि ऑडिओ (श्राव्य) इशारा देणारी प्रणाली (इंटरकनेक्टेड प्रणाली) असेल.
रेल्वेने काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेसाठी कार्यान्वित झालेल्या एका लोकल रॅकचे ‘ऑटोमॅटिक डोअर’ लावून चाचणी (Automatic Door Trial) घेतलेली आहे.
तसेच, पुढील पाच वर्षांत मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात नव्या एसी लोकल खरेदी करण्याची योजना आहे.
या नवीन सुधारणांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे.


