मुंबई: गेली २६ वर्षे विविध नाट्यकलाकृतींमधून रंगमंच गाजवणारा कानसे ग्रुप आपल्या २७व्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावर्षी समूहाच्या वतीने स्वराज्याचा धगधगता, शौर्यपूर्ण आणि अजूनही पूर्णपणे न उलगडलेला इतिहास रंगमंचावर दिमाखात सादर केला जाणार आहे.
“हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या स्वराज्यासाठी असंख्य मावळ्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यातील काही पराक्रम इतिहासात नोंदले गेले असले, तरी अनेक शूर मावळ्यांचे योगदान आजही अज्ञात आहे. अशाच १६०० पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याची साक्ष शिवनेरी आजही अभिमानाने मिरवते. त्या न वाचलेल्या इतिहासाच्या पानांना नाट्यरूप देत, प्रेक्षकांना केवळ पाहण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
कोकण सांस्कृतिक कलामंच निर्मित,
दिनेश कुडतरकर साहेब पुरस्कृत
आणि साईश्रद्धा कलापथक व कानसे ग्रुप आयोजित
कोकणची लोककला “नमन”
हा भव्य नाट्यप्रयोग
दिनांक : २३ डिसेंबर २०२५
स्थळ : दिनानाथ नाट्यगृह
वेळ : रात्री ८:३० वाजता
स्वराज्याचा तेजस्वी इतिहास, कोकणची लोककला आणि पराक्रमाची ज्वाला अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


