रत्नागिरी/सिंधुदुर्ग:ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने उत्तर रेल्वेच्या समन्वयाने अमृतसर आणि मडगाव (गोवा) दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या आणि सणासुदीला गावी येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
१. अमृतसर ते मडगाव जंक्शन (गाडी क्र. ०४६९४):
ही गाडी अमृतसर येथून दिनांक २२/१२/२०२५, २७/१२/२०२५ आणि ०१/०१/२०२६ (सोमवार) रोजी पहाटे ०५:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:५५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
२. मडगाव जंक्शन ते अमृतसर (गाडी क्र. ०४६९३):
ही गाडी मडगाव येथून दिनांक २४/१२/२०२५, २९/१२/२०२५ आणि ०३/०१/२०२६ (बुधवार) रोजी सकाळी ०८:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०४:३० वाजता अमृतसरला पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे:
ही विशेष ट्रेन प्रवासात बियास, जालंधर सिटी, लुधियाना, अंबाला कॅंट, पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.
गाडीची रचना (Coaches):
एकूण २१ एलएचबी (LHB) कोच असलेल्या या ट्रेनमध्ये:
३ टायर एसी: ०२ कोच
३ टायर एसी इकॉनॉमी: ०२ कोच
स्लीपर क्लास: ०८ कोच
जनरल कोच: ०७ कोच
जनरेटर कार: ०२
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. वेळापत्रकाच्या अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.


