मुंबई | ५ जानेवारी २०२६:
कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि मागणी लक्षात घेता, गाडी क्रमांक २२११५ / २२११६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – करमाळी – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी आता करमाळीऐवजी मडगाव जंक्शन स्थानकापर्यंत धावेल आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू करेल.
आठवड्यातुन एकदा धावणार्या या गाडीला आता १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘NTES’ ॲपचा वापर करावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Facebook Comments Box


