मुंबई: मुंबई ते कोकणातील विजयदुर्ग दरम्यान M2M फेरीज ची रो-रो (Ro-Ro) सेवा आज, १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथे सकाळी ८ वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
रो-पॅक्स सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास रस्त्याने १०-१२ तासांऐवजी केवळ ५ ते ७ तासांत पूर्ण होऊ शकतो. ही सेवा शिमगा (होळी) सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, कोकणवासीयांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली आहे. M2M Princess ही उच्च गतीची फेरी वापरली जात असून, यात प्रवासींसह दुचाकी आणि चारचाकी वाहनेही नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
उद्घाटन फेरीच्या पहिल्याच दिवशी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक प्रवासी या नव्या समुद्री मार्गाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. ही सेवा कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही १६ दिवसांच्या पायलट टप्प्यातील सेवा असून, भविष्यात नियमित आणि विस्तारित स्वरूपात चालवली जाणार आहे.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ! पहिली बोट कोकणच्या दिशेने रवाना#कोकण #विजयदुर्ग #रोरोफेरी #मुंबईबंदरे #कोकणपर्यटन#Konkan #Vijaydurg #RoRoFerry #MumbaiToKonkan #CoastalTravel pic.twitter.com/lMjwZfF2Cg
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 1, 2026


