Author Archives: Kokanai Digital

Amboli: धक्कादायक! वर्षा पर्यटनासाठी आलेला पर्यटक ३०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरु

   Follow us on        

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर
राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

   Follow us on        

Konkan Railway: २५ वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासीयांसाठी एक जलद, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी होती, त्यामुळे ज्या गाड्या या मार्गावर धावत होत्या त्या प्रवाशांच्या त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत्या. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली, गर्दी वाढत गेली आणि अधिक गाड्यांची मागणी होण्यास सुरवात झाली रेल्वे प्रशासनानेही गरज लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली. मात्र कोकण रेल्वे मार्गाचे एकेरीकरण आणि इतर मर्यादांमुळे त्यात अपेक्षित वाढ झाली नाही आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालत असून आत गाड्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विलीनीकरण या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच हे शक्य आहे.

कोकण रेल्वे प्रवाशी संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यामुळे प्रशासनाने सुद्धा यात लक्ष घातले असून त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या गोष्टीला काही वर्षे जातील. मात्र तोपर्यंत रेल्वेकडे जी संसाधनाने आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजचे आहे. दुर्दैवाने तसे होत नसल्याचे दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या काही गाड्या कमी क्षमतेने धावत आहेत. या गाडयांना डबे जोडून त्याची क्षमता वाढवणे शक्य आहे. मात्र रेल्वे प्रशासन रेकची आणि डब्यांची उपलब्धता नसणे, पिट लाईनची कमी लांबी अशी थातुर मातुर कारणे देऊन हे टाळत आहे. खरेतर काही बदल करून या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजावरून तोल जाऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. कधी कधी भीती वाटत आहे कि गर्दीमुळे मुंब्रा स्थानकावर घडलेल्या घटनेसारखा अपघात घडेल. अशा घटना घडल्यावर जागे न होता हे अपघात घडू न देणे यासाठी प्रयत्न करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

नवीन गाड्या येतील तेव्हा येतील. परंतु आताच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू सुपरफास्ट, रत्नागिरी दिवा, सावंतवाडी दिवा, मडगाव वांद्रे, पुणे एर्नाकुलम, तेजस २२ डब्यांनी आणि वंदे भारत २० डब्यांची चालवल्यास दिवसाला एका दिशेला किमान ४० डबे वाढवता येतील. एका डब्यात सरासरी ८० प्रवासी धरल्यास दिवसाला किमान ३००० प्रवासी जास्त नेता येऊ शकतील. ही संख्या दोन नवीन गाड्यांएवढी आहे. रेल्वे उपलब्ध साधनसंपत्तीचा अपव्यय करत आहे.

अक्षय महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

Pic credit – @akshaymahapadi

 

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

२७ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 11:22:17 पर्यंत
  • नक्षत्रपुनर्वसु – 07:23:13 पर्यंत
  • करण-कौलव – 11:22:17 पर्यंत, तैतिल – 22:34:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 21:10:21 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03:06
  • सूर्यास्त- 19:19:36
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 07:44:00
  • चंद्रास्त- 21:22:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :
  • औद्योगिक कामगार जागतिक दिन
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1806 : ब्रिटिश सैन्याने अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स ताब्यात घेतली.
  • 1946 : कॅनडाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्व कायद्यामध्ये कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या केली.
  • 1950 : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
  • 1954 : मॉस्कोजवळील ओबनिंस्क येथे जगातील पहिले अणुऊर्जेवर चालणारे वीज केंद्र सुरू झाले.
  • 1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. वापरण्यास सुरुवात.
  • 1977 : जिबूतीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1991 : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
  • 1996 : अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
  • 2002 : जी-8 देशांनी रशियाच्या अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या योजनेला सहमती दिली.
  • 2004 : अमेरिका आणि युरोपियन युनियनने G.P.S. गॅलिलिओच्या विकासात सहकार्य करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.
  • 2014 : भारतातील आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या पाइपलाइनचा स्फोट होऊन किमान चौदा जणांचा मृत्यू झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1462 : ‘लुई (बारावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1515)
  • 1550 : ‘चार्ल्स (नववा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1574)
  • 1806 : ‘ऑगस्टस डी मॉर्गन’ – ब्रिटिश गणितज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ यांचा जन्म
  • 1864 : ‘शिवराम महादेव परांजपे’ – काळ या साप्ताहिकाचे संपादक याचं जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1929)
  • 1869 : ‘हॅन्स स्पेमन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1875 : ‘दत्तात्रेय कोंडो घाटे’ – यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1899)
  • 1880 : ‘हेलन केलर’ – अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1968)
  • 1899 : ‘जुआन पेप्पे’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1981)
  • 1917 : ‘खंडू रांगणेकर’ – आक्रमक डावखुरे फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1984)
  • 1939 : ‘राहुलदेव बर्मन’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 जानेवारी 1994)
  • 1962 : ‘सुनंदा पुष्कर’ – भारतीय-कॅनडातील उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2014)
  • 1964 : ‘पी. टी. उषा’ – पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1708 : ‘धनाजी जाधव’ – मराठा साम्राज्यातील सेनापती यांचे निधन.
  • 1839 : ‘रणजितसिंग’ – शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1780)
  • 1996 : ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली’ – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1909)
  • 1998 : ‘होमी जे. एच. तल्यारखान’ – सिक्कीमचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1917)
  • 2000 : ‘द. न. गोखले’ – शिक्षणतज्ञ व चरित्रकार यांचे निधन.
  • 2002 : ‘कृष्ण कांत’ – भारतीय उपराष्ट्रपती यांचे निधन.
  • 2008 : ‘सॅम माणेकशाॅ’ – फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: गणेश चतुर्थी रेल्वे आरक्षणासाठी कोकण रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

   Follow us on        

 

Konkan Railway: यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी नियमित गाड्यांसाठी रेल्वे आरक्षण सुरु झाले असून या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल होत आहे. बहुतेक सर्वच गाड्या आता रिग्रेट हे स्टेटस दाखवत असल्याने ज्या गणेश भक्तांना आरक्षण भेटले नाही ते नाराज झाले आहेत.

यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच मिनिटभरातच सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. सर्वच नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने ‘रिग्रेट’चा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या गणेशभक्त तिकीटे न भेटल्याने नाराज झाले आहेत.

 

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा ६० दिवस अगोदरच म्हणजेच २३ जूनपासून आरक्षणाची दालने खुली केली. त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले. यानंतर ‘रिग्रेट’चाच शेरा मिळत असल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, एलटीटी-मडगाव, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता संपली आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. यामुळे गणेशभक्तांची सारी मदार आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून आहे. कोकण विकास समितीसह अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, जल फाऊंडेशनसह अन्य प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवात कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्यासाठी आग्रह धरला आहे. मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी गणेशभक्त बाळगून आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

Sawantwadi: सावंतवाडीकरांची ‘गांधीगिरी’, साजरा केला जाणार ‘अपूर्ण टर्मिनसचा वाढदिवस’

   Follow us on        

Sawantwadi:सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला उद्या 27 जून रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. भूमिपूजन झाले तरी अद्याप टर्मिनस पूर्णत्वास आले नसल्याने याची जाग प्रशासनाला आणून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून 27 जून 2025 रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता टर्मिनसचा वाढदिवस साजरा करीत साखर वाटून गांधीगिरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड .संदीप निंबाळकर यांनी येथे दिली आहे.


सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे.रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच सावंतवाडी शहर आणि परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. भूमिपूजनाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन ‘टर्मिनस भूमिपूजन कोनशिलेचा वाढदिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

 

२६ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 13:27:29 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 08:47:50 पर्यंत
  • करण-भाव – 13:27:29 पर्यंत, बालव – 24:20:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 23:40:08 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:06
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-मिथुन – 25:41:05 पर्यंत
  • चंद्रोदय- 06:37:59
  • चंद्रास्त- 20:30:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :
  • अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस
  • अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1723 : रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू ताब्यात घेतली.
  • 1819 : सायकलचे पेटंट घेण्यात आले.
  • 1906 : पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस आयोजित करण्यात आली.
  • 1949 : बेल्जियममधील महिलांना पहिल्यांदा संसदीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1959 : स्वीडिश बॉक्सर इंगेमर जोहानसन हेवीवेट बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन बनला.
  • 1960 : सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1960 : मादागास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1968 : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
  • 1973 : सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस-3एम प्रकारच्या रॉकेटचा स्फोट.
  • 1974 : ओहायो, यूएसए मधील एका सुपरमार्केटने उत्पादनांना बार कोड लागू करण्यास सुरुवात केली.
  • 1974 : नागपूरजवळील कोराडी येथील तत्कालीन सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली.
  • 1975 : राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सुरक्षेसाठी भारतात आणीबाणी जाहीर केली.
  • 1979 : बॉक्सर मुहम्मद अली निवृत्त.
  • 1999 : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
  • 1999 : शिवाजी राजांची मुद्रा असलेले नाणे चलनात आले.
  • 2000 : पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1694 : जॉर्ज ब्रांड स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1730 : चार्ल्स मेसिअर फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1817)
  • 1824 : लॉर्ड केल्व्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1907)
  • 1838 : बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1894)
  • 1873 : अँजेलिना येओवार्ड गायिका व नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 1930)
  • 1874 : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1922)
  • 1888 : नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1967)
  • 1892 : पर्ल एस. बक अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1973)
  • 1914 : शापूर बख्तियार इराणचे 74 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑगस्ट 1991)
  • 1951 : गॅरी गिल्मोर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1992 : मनप्रीत सिंह अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 363 : 363ई.पुर्व: ज्युलियन रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1810 : जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र हॉट एअर बलून चे सहसंशोधक यांचे निधन.
  • 1943 : कार्ल लॅन्ड्स्टायनर नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 जून 1868)
  • 1980 : गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे पत्रकार यांचे निधन.
  • 2001 : वसंत पुरुषोत्तम काळे लेखक व कथाकथनकार यांचे निधन. (जन्म: 25 मार्च 1932)
  • 2004 : यश जोहर भारतीय चित्रपट निर्माता यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1929)
  • 2005 : एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1948)
  • 2008 : जनरल माणेकशॉ यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

२५ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 16:04:02 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 10:41:54 पर्यंत
  • करण-नागा – 16:04:02 पर्यंत, किन्स्तुघ्ना – 26:42:25 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 26:39:08 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:05
  • सूर्यास्त- 19:17
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 19:32:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :
  • नाविकाचा दिवस
  • जागतिक त्वचारोग दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1918 : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील वतनदारी प्रथा रद्द करणारा कायदा केला.
  • 1934 : महात्मा गांधी यांचा पुणे महापालिकेने सन्मान केला. त्यावेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध: फ्रान्सने औपचारिकपणे जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1947 : ॲन फ्रँकची डायरी प्रकाशित झाली.
  • 1975 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
  • 1975 : मोझांबिकला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1983 : भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला.
  • 1993 : किम कॅम्पबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
  • 2000 : मादाम तुसादच्या जगप्रसिद्ध मेणाच्या प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 2004 : रशियाने भारतासोबत सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864 : ‘वॉल्थर नेर्न्स्ट’ – नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1869 : ‘दामोदर हरी चापेकर’ – महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी यांचा जन्म.
  • 1900 : ‘लुई माउंट बॅटन’ – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1979)
  • 1903 : ‘जॉर्ज ऑरवेल’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1950)
  • 1907 : ‘जे.हान्स डी. जेन्सेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1915 : ‘काश्मीर सिंग कटोच’ – भारतीय लष्करी सल्लागार यांचा जन्म.
  • 1924 : ‘मदन मोहन’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1975)
  • 1928 : ‘पेओ’ – द स्मर्फ चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 1992)
  • 1928 : ‘अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह’ – नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1931 : ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ – भारतीय पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2008)
  • 1936 : ‘युसूफ हबीबी’ – इंडोनेशियाचे तिसरे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1974 : ‘करिश्मा कपूर’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1975 : ‘व्लादिमिर क्रामनिक’ – रशियन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
  • 1978 : ‘आफताब शिवदासानी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म
  • 1986 : ‘सई ताम्हनकर’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 134 : 134इ.पुर्व : ‘नील्स’ – डेन्मार्कचा राजा यांचे निधन.
  • 1922 : ‘सत्येंद्रनाथ दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन.
  • 1971 : ‘जॉन बॉइडऑर’ – स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1995 : ‘अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1997 : ‘जॅक-इवेसकुस्तू’ – फ्रेंच संशोधक यांचे निधन.
  • 2000 : ‘रवीबाला सोमण-चितळे’ – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या यांचे निधन.
  • 2009 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन गायक यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1958)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या दरम्यान बांधण्यात येणार्‍या राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search