Author Archives: Kokanai Digital

०५ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 07:38:56 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 14:02:16 पर्यंत
  • करण-भाव – 07:38:56 पर्यंत, बालव – 20:04:55 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 24:19:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:1
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-कर्क – 14:02:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:09:59
  • चंद्रास्त- 26:14:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय अंतराळवीर दिन National Astronaut Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1260 : कुबलाई खान मंगोलियाचा सम्राट झाला.
  • 1640 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
  • 1646 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • 1835 : युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
  • 1901: पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 1905 : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
  • 1936 : इटालियन सैन्याने इथिओपियन शहर अदीसाबाबा ताब्यात घेतले.
  • 1955 : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व मिळाले.
  • 1964 : युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिवस म्हणून घोषित केला.
  • 1997 : जयदीप आमरे साडेपाच वर्षाच्या मुलाने पोहूण गोव्यात मांडवी नदी पार केली.
  • 1999 : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वात जुने लिखित अवशेष सापडले.
  • 2021 : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीचा अंत जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1479 : ‘गुरू अमर दास’ – शिखांचे तिसरे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1574)
  • 1818 : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1883)
  • 1864 : ‘निले ब्लाय’ उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
  • 1911 : ‘प्रितलाता वडेदार’ – भारतीय शिक्षक व कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1932)
  • 1916 : ‘ग्यानी झॆलसिंग’ – भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1994)
  • 1989: ‘लक्ष्मी राय’ – तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1821 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1769)
  • 1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1890)
  • 1943 : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे – यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1872)
  • 1945 : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
  • 1989 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1904)
  • 2006 : ‘नौशाद अली’ – ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
  • 2007 : ‘थिओडोर हेरॉल्ड मॅमन’ – लेसर चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1927)
  • 2008 : ‘इरब रोबिन्स’ – बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1917)
  • 2012 : ‘सुरेंद्रनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1937)
  • 2017 : ‘लीला सेठ’ – दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

सावंतवाडी आगारातून बोरिवली, पुणे बस सुविधा सुरु

   Follow us on        
सावंतवाडी: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सावंतवाडी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी आगाराला अलीकडेच नवीन पाच बीएस-सिक्स बसेस मिळाल्या आहेत. या बसेस ४० सीट असलेल्या पूश बँक, आरामदायी आहेत. चार्जिंग पोर्ट अशा बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोडण्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक नीलेश गावित व स्थानकप्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली. प्रवाशांनी या बसचे आरक्षण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही आगारातर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-पुणे ही एसटी बस सकाळी सात वाजता सुटणार आहे. आगारातून बांदा-बोरिवली ही बस सोडण्यात येणार आहे. ही बस आगारातून दुपारी तीन वाजता बांदा येथे जाईल. तेथून चार वाजता ती सुटून पुन्हा सावंतवाडीत येणार आहे. त्यानंतर साडेचार वाजता बोरिवलीला मार्गस्थ होणार आहे. प्रवाशांनी या दोन्ही बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या आठ दिवसांत चाकरमान्यांची वाढती गर्दी व आरक्षण पाहता, आणखी ज्यादा गाड्या मुंबई-बोरिवली व पुणे या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आगाराच्या ताफ्यात नव्याने पाच एसटी बसेस उपलब्ध झाल्याने बसेसची संख्या ८३ झाली आहे. या बसच्या माध्यमातून सर्व मार्गावर वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यास मदत झाली आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार ज्यादा बसेसही सोडण्यात येणार आहेत.. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. नव्याने मिळालेल्या नवीन पाच बसेस या विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोडण्यात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

HSC Result 2025: मोठी बातमी! १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल.

   Follow us on        
12th Result date: यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी मंडळाने काही अधिकृत संकेतस्थळे (official websites) जाहीर केली आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयवार गुण पाहता येतील. तसेच, निकालाची प्रिंट (print out) काढण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल (overall result) कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक :

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे- दीपक केसरकर

   Follow us on        
शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना  व्यक्त केले.
ते म्हणालेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६० टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली म्हणून आमचा विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे? ते पुढे म्हणाले, नागपूरमध्ये वाघ दिसतात, तर आमच्या जंगलात काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नागपूरहून सुरू होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो, तसाच शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा. रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरू झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.

०४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 07:22:09 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 12:54:44 पर्यंत
  • करण-वणिज – 07:22:09 पर्यंत, विष्टि – 19:24:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-गण्ड – 24:41:16 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:11
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 12:13:59
  • चंद्रास्त- 25:37:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1799 : टिपू सुलतानचा इंग्रजांकडून श्रीरंगपट्टणाच्या युद्धात पराभव झाला.
  • 1854 : भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
  • 1904 : अमेरिकन लोकांनी पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • 1930 : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना ताब्यात घेऊन येरवडा तुरुंगात ठेवले.
  • 1967 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिकच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1979 : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1989: पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 30 टका जगा राखीव ठेवण्याची घोषणा केली.
  • 1992 : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
  • 1995 : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’चे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
  • 1996 : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1008 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1060)
  • 1649 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंड चे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1731)
  • 1655 : ‘बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी’ – पियानोचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1731)
  • 1767 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1847)
  • 1825 : ‘थॉमास हक्सले’ – ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 1895)
  • 1847 : धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1917)
  • 1928 : इजिप्तचे 4थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
  • 1929 : ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1993)
  • 1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 2009)
  • 1934 : भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
  • 1940 : इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
  • 1945 : ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
  • 1984 : बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 2007)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1799 : ‘टिपू सुलतान’ – म्हैसूरचा वाघ यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: 20 नोव्हेंबर 1750)
  • 1938 : ‘कानो जिगोरो’ – ज्युदोचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 28 ऑक्टोबर 1860)
  • 1980 : आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.
  • 1968 : बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • 1980 : युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: 7 मे 1892)
  • 1980 : सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1905)
  • 2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1923)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 07:55:07 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 12:35:21 पर्यंत
  • करण-तैतुल – 07:55:07 पर्यंत, गर – 19:32:18 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शूल – 25:40:29 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-मिथुन – 06:38:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:15:00
  • चंद्रास्त- 24:55:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • सूर्य दिवस Sun Day
  • जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन World Press Freedom Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1715: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले.
  • 1802: वॉशिंग्टन (DC) शहराची स्थापना झाली.
  • 1913: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1939: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1947: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • 1947 : जय हिंद भारतीय तिकीट प्रसिध्द
  • 1973: 1451 फूट आणि 108 मजली, शिकागोमधील सीअर्स टॉवर जगातील सर्वात उंच इमारत बनली (त्यावेळी).
  • 1994: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या निवडणुकीत ज्यामध्ये सर्व जातींच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार होता, विद्यमान अध्यक्ष एफ.डब्ल्यू.डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने बहुमत मिळवले.
  • 1999: एडविन जस्कुलस्की या 96 वर्षीय गृहस्थांनी 100 मी. त्याने 24.04 सेकंदात शर्यत धावण्याचा विश्वविक्रम केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1818 : ‘महर्षी भालजी पेंढारकर’ – चित्रपट यांचा जन्म.
  • 1896 : ‘व्ही. के. कृष्ण मेनन’ – भारताचे संरक्षणमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)
  • 1898 : : ‘गोल्डा मायर’ – शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
  • 1951 : ‘अशोक गहलोत’ – राजस्थानचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1959 : ‘उमा भारती’ – भाजपाच्या जेष्ठ नेत्या यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1912 : नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी – उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक यांचे निधन.
  • 1969 : ‘डॉ. झाकीर हुसेन’ – भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1897)
  • 1971 : ‘धनंजय रामचंद्र गाडगीळ’ – प्रसिध्द अर्थशास्त्र यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1901)
  • 1977 : ‘हमीद दलवाई’ – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 1978 : ‘विठ्ठल दत्तात्रय घाटे’ – लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ यांचे पुणे येथे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1895)
  • 1981 : ‘फातिमा रशीद’ ऊर्फ ‘नर्गिस’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 1 जून 1929)
  • 1996 : ‘वसंत गवाणकर’ – व्यंगचित्रकार यांचे निधन.
  • 2000 : ‘शकुंतलाबाई परांजपे’ – जेष्ठ समाजसेविका यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1906)
  • 2006 : भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: 30 ऑक्टोबर 1949)
  • 2009 : जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: 2 मार्च 1931)
  • 2011 : गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: 10 मे 1932)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.

०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

०२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 09:17:53 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 13:05:21 पर्यंत
  • करण-बालव – 09:17:53 पर्यंत, कौलव – 20:30:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 27:19:32 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 18:59
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 10:11:59
  • चंद्रास्त- 24:04:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय भाऊ आणि बहिण दिन National Brothers And Sister Day
  • राष्ट्रीय जीवन विमा दिवस National Life Insurance Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1908 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
  • 1918 : जनरल मोटर्सने शेवरलेट मोटर कंपनी विकत घेतली.
  • 1921 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव आणि तात्याराव यांना अंदमानातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले.
  • 1994 : बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण.
  • 1994 : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहण्याचा विक्रम केला.
  • 1997 : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1997 : पुण्याच्या अभिजित कुंटेने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपदाचे निकष पूर्ण केले.
  • 1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
  • 1999 : मीरा मॉस्कोसो पनामाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
  • 2004 : एस. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे नेव्ही सील 6 ने ठार मारले.
  • 2012 : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 दशलक्षमध्ये विकले गेले. हा नवा विश्वविक्रम ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1899 : ‘भालजी पेंढारकर’ – मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1994)
  • 1920 : ‘डॉ. वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1983)
  • 1921 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1992)
  • 1929 : ‘जिग्मे दोरजी वांगचुकयांचा’ – भूतानचे राजे जन्म. (मृत्यू: 21 जुलै 1972)
  • 1969 : ‘ब्रायन लारा’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘अहटी हेनला’ – स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1519 : ‘लिओनार्डो दा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1452)
  • 1683 : ‘रघुनाथ नारायण हणमंते’ तथा रघुनाथपंडित शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी यांचे निधन.
  • 1963 : ‘डॉ. के. बी. लेले’ – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1882)
  • 1973 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 8 जून 1910)
  • 1975 : ‘शांताराम आठवले’ – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1910)
  • 1998 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य यांचे निधन. (जन्म: 18 मे 1913)
  • 1999 : ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
  • 2011 : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन ला अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: 10 मार्च 1957)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on        
Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस

Mumbai Goa Highway: खुशखबर! कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार

   Follow us on        
Kashedi Tunnel | मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक होणार आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यांपैकी पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला असून, उर्वरित वीजपुरवठा १५ दिवसांत पूर्ववत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून १५ मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बोगद्याचा वापर सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्याने, ही सुविधा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
spacer height=”20px”]
कशेडी घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या १० ते १५ मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, १५ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search