Barsu Refinery Protest – समर्थक आणि विरोधक नेत्यांच्या सभा, मोर्चा या मुळे बारसूतील वातावरण पुन्हा तापणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आज बारसू सड्यावर आंदोलक फारसे फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत राहिलेला होता. दरम्यान गेल्या सुमारे १२ते१३ दिवसांपासून सुरु असलेले माती परीक्षणाचे काम आजही सुरु होते. या परिसरात मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ आज सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरु असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांनी केला. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या विरोधात आता गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सुमारे २००-३०० स्थानिक प्रकल्प विरोधक उपोषणस्थळी उपस्थित आहे.
Old Memories MSRTC – सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या ‘भक्ती दर्शन’ या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला ‘भक्ती दर्शन’ असे ब्रँडिंग करून ही बस पर्यटकांना मार्लेश्वर, कृष्णेश्वर मंदिर, संभाजी स्मारक समाधी, परशुराम मंदिर, चिपळूण, डेरवण येथील प्रति शिवसृष्टी आणि थिबा पॉईंट येथील अरबी समुद्रातील नयनरम्य सुर्यास्ताचे दर्शन घडवत असे.
सकाळी ८ ते संध्याकाळी साडे ६ पर्यंत, एवढी सर्व प्रेक्षणीय स्थळे अगदी माफक दरात दाखवल्यामुळे, वेळ न मिळणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावी आल्यावर या बसचा प्रवास म्हणजे फार मोठी पर्वणीच होती. संगीताचा आस्वाद घेत प्रवास घेत करणे, चालक/वाहकांचे सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रवासात मिळणारी वृत्तपत्रे यावर प्रवासी बेहद खुश होता. कालांतराने महाराष्ट्रात अश्या अनेक दर्शन फेऱ्यांचे एसटीने नियोजन केले आणि या फेऱ्यांना प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.
आज पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या असून, अनेक नवनवीन ठिकाणांची भर यात पडत आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, एसटीने पुन्हा एकदा पर्यटनाची संधी पाहता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
बाहेर फिरायला आलेला व्यक्ती हा प्रवासी भूमिकेत नसून, तो पर्यटक भूमिकेत असल्याने यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावे लागेल, नियोजन कसे करावे लागेल, यासाठी एसटीने एक स्वतंत्र विभाग तयार केला, तर एसटीच्या आर्थिक स्रोतात अधिकची भर पडून, प्रवाश्यांना देखील किफायतशीर पर्यटनाचा आनंद घेता येईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
लेखक – रोहित धेंडे.
भक्ती दर्शन : एक अनोखी संकल्पना 🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या 'भक्ती दर्शन' या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते.आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला 'भक्ती दर्शन' असे ब्रँडिंग करून
(१/६) pic.twitter.com/B9eTedWb5b— Rohit Dhende (@avaliyapravasi) May 8, 2023

Vision Abroad

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.
[email-subscribers-form id=”2″]
केरळ : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला, यात अधिक लहान मुले आहेत. मृतांची संख्या 21 वर पोहोचली असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघात होताच सुरूवातीला 9 आणि नंतर काही वेळाने 15 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याच्याही बोलले जात आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे.
तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम येथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झा ला.
रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.
जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.
कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,
कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.
कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.