Category Archives: मुंबई

Video : मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट

Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. पण, रेल्वे डब्यांमध्ये आणि रेल्वे यार्डमध्ये उंदीर नियंत्रणाचे उपाय नियमितपणे केले जातात, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

 

 

 

एसटीची मुंबई ते बांदा स्लीपर बससेवा आजपासून सुरु; वेळापत्रक, थांबे आणि तिकीटदर येथे जाणून घ्या.

मुंबई : एसटीची मुंबई ते बांदा अशी नवीन शयनयान बस सेवा आजपासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे. ही गाडी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सेंट्रल या स्थानकावरून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ती बांदा या ठिकाणी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ती बांदा शहरातून संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून ती मुंबई सेंट्रलला ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल 
ही गाडी मुंबई गोवा महामार्गावरून न चालविता पुणे सातारा मार्गे चालविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील फक्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 
मुंबई ते बांदा या मार्गावरील प्रवासासाठी 1246 रुपये तिकीट दर असणार आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला प्रवाशांसाठी असलेल्या तिकीट सवलती या विना वातानुकूलीत शयनयान बसला देखील लागू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल – बोरीवली – बांदा या मार्गावर ही शयनयान बसस धावणार आहे. त्यानंतर गोव्यातील पणजीपर्यंत या बसेचा विस्तार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पन्नास विना वातानुकूलित शयनयान बसेस ( sleeper coach ) येणार आहेत.
या गाडीचे थांबे
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Bus-Stops.pdf” title=”__ MSRTC __ Bus Stops”]
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/MSRTC-__-Stops2.pdf” title=”__ MSRTC __ Stops2″]

‘नेरुळ’ च्या जागी ‘नेरूल’; ”सुधारणा न केल्यास…” मराठी एकीकरण समितीचा रेल्वेला इशारा

ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत. 

रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. 

ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा  नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.

याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे 

एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर थांबणार

 

Konkan Railway News :कोंकण रेल्वे मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस या जलद गाडीला  पनवेल या स्थानकावर थांबा मिळणार आहे. 26 ऑगस्ट पासून हा बदल अमलात आणला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

आठवड्यातुन दोन दिवस धावणारी या गाडीची पनवेल स्थानकावर थांबण्याची वेळ जाहीर करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून रात्री 20:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12223 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ रात्री 02:25 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

परतीच्या प्रवासात एर्नाकुलम स्थानकावरून रात्री 21:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12224 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ दुपारी 15:30 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेस ओळखली जाते. एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  12223/24 ही गाडी  एलटीटी – एर्नाकुलम या स्थानकादरम्यान ही  फक्त रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबते. एलटीटी वरून सुटून ही गाडी डायरेक्ट रत्नागिरी स्थानकावर थांबत होती. या गाडीला पनवेल येथे थांबा मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होती. रेल्वे बोर्डाने ही मागणी पूर्ण केली आहे. मात्र दक्षिणेकडील कुन्नूर, कासारगोड आणि शोरानूर या स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष केले आहे.

Mumbai | चिकन डिशमध्ये आढळला उंदीर; हॉटेल मालकावर कारवाई

मुंबई : वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला चक्क उंदीर आढळला आहे.  त्याच्या ताटात उंदीर आढळल्याची तक्रार केल्यानंतर वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना मंगळवारी अटक करण्यात आली.
रविवारी रात्री पापा पांचो दा ढाब्यावर जेवण कमी चवीचे असल्याचे  गोरेगावस्थित अनुराग सिंग या बँक अधिकाऱ्याने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे रेस्टॉरंट दोन दशकांहून अधिक काळ पंजाबी खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे.
 
वांद्रे येथे दिवसभर खरेदी केल्यानंतर रविवारी रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सिंग यांनी सांगितले की त्यांनी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदीराचे बाळ आढळले. सुरुवातीला तिने याकडे लक्ष दिले नाही आणि चिकनचा तुकडा समजून त्यातील काही खाल्ले. बारकाईने पाहणी केल्यावर त्याला कळले की तो उंदराचे बाळ आहे.
 
जेव्हा त्यांनी  वेट स्टाफकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी माफी मागितल्याचे सांगितले, परंतु व्यवस्थापक आणखी 45 मिनिटे पुढे आला नाही. सिंग म्हणाले की, करीत उंदीर सापडल्यानंतर लगेचच आजारी वाटले, ज्यापैकी काही त्याने आधीच खाल्ले होते. घरी परतताना त्यांनी काही औषधे लिहून दिलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला.
 
वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने हॉटेल व्यवस्थापक विवियन सिक्वेरा आणि दोन स्वयंपाकी यांच्या अटकेची पुष्टी केली. “त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या अन्नात भेसळ) आणि 336 (कोणत्याही व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असलेल्या अविचारी किंवा निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. तिघांचीही जामिनावर सुटका झाली. ते म्हणाले की ते आता रेस्टॉरंटच्या मांस पुरवठादाराची चौकशी करत आहेत.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा प्रवास आरामदायक होणारा! १२ डब्यांच्या ‘या’ ४९ लोकल उद्यापासून १५ डब्यांसह धावणार

Mumbai Local Train News : लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. गर्दीच्या वेळी लोकलला लटकत प्रवास टाळण्यासाठी व एका लोकल ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना आरामशीर प्रवास करता यावा, याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा नव्या बदलासह रेल्वे धावणार आहेत.

उपनगरीय वाहतूक सेवा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. ४९लोकल ट्रेन १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार आहेत. त्यामध्ये मुख्यपणे चर्चगेट ते विरार दरम्यानची स्लो लाइन आणि केवळ १५ फास्ट लाइन सेवांचा समावेश आहे.

खालील गाड्या उद्या १५ ऑगस्टपासून या बदलानुसार धावणार आहेत.

झूम करण्यासाठी फोटोवर लॉंग प्रेस करा..

दोन वंदे भारत एक्सप्रेसना उद्यापासून ठाणे व कल्याण येथे थांबा

मुंबई: मुंबई येथून सुटणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत गाड्यांना उद्या दिनांक ४ ऑगस्टपासून  कल्याण आणि ठाणे येथे 2 मिनिटे थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

शिर्डी साईनगर एक्सप्रेस सीएसएमटीहून सुटल्यानंतर सकाळी ७.११ वाजता कल्याणला थांबेल. सीएसएमटीला परतताना ही गाडी कल्याणला रात्री ९.४५ वाजता थांबेल.

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूरसाठी निघाल्यानंतर दुपारी ४.३३ वाजता ठाणे स्थानकावर थांबेल. दुपारी ४.५३ वाजता कल्याणला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ती ठाणे येथे सकाळी 11.50 वाजता थांबेल.

Rainfall Updates | मुंबईसह कोकणातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व  संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढून उद्या  प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे

Barsu Refinery | आंदोलन पुन्हा पेटणार; आंदोलकांचा थेट विधानभवनावर मोर्चा काढण्याचा बेत

Barsu Refinery | बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला होणारे  आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. येत्या  २० जुलैला विधान भवनावर मोर्चा काढण्याची योजना बारसू रिफायनरी विरोधी समितीने आखली आहे . यासंबंधी समितीचे एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली आहे. या समितीबरोबर राज्यातील आणि देशातील काही संघटना देखील या मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चाला १ लाखापेक्षा  जास्त विरोधक एकत्र जमवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 
असा असणार हा मोर्चा
दिनांक २० जुलै रोजी राणीची बाग ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधानभवनावर कूच करून सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. 
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण घातक प्रकल्प म्हणून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा विरोध झुगारून येथे माती परीक्षण करण्यात आले असून सरकारतर्फे आपली मनमानी करताना दिसत आहे, मात्र ‘एकाच जिद्द; रिफायनरी रद्द’ या घोषवाक्याखाली समितीने आंदोलन घडले असून जोपर्यत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी समितीची भूमिका आहे. 

मुंबई प्रभादेवी येथे ”आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” संपन्न

मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.

महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search