सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. CBSE बोर्डमध्ये SSC च्या पहिल्या बॅचनं १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या SSC बॅचनं CBSE बोर्डात १०० टक्के निकालासह बाजी मारली आहे. प्रशालेची ही पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपलं नाव कोरल आहे.
प्रशालेमध्ये वेदीका विनायक परब हीन ९५.८३ % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. देवाशीष प्रसाद महाले यान ९५. ६७ % प्राप्त करत द्वितीय तर देवांग राजेश फोंडेकर यान ९३.०० % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थ्यांनींन ८९.५० % गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इंग्रजी विषयात वेदीका परब, देवाशीष महाले यांनी १०० पैकी ९८ गुण, हिंदी विषयात देवाशीष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी १०० पैकी ९९ गुण प्राप्त करत विक्रम रचला. गणित विषयात वेदीकान ९२ तर विज्ञान विषयात ९६, सामाजिक शास्त्रमध्ये ९८ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य व्यंकटेश बक्षी, शिक्षक प्रियांका डिसोझा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दिपीका कदम यांनी मोलाच मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, व्यवस्थापक समन्वयक सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यी, शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन केले.
Vision Abroad