BEST ची ‘BEST’ ऑफर १९ रुपयांमध्ये १० फेऱ्यांचा प्रवास..

मुंबई: बेस्टकडून विशेष दसरा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केवळ १९ रुपये भरून ९ दिवसांत १० प्रवास फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. नव्या आणि जुन्या ‘चलो अँपधारकांना या सुविधेचा केवळ एकदाच लाभ घेता येणार असून अधिकाधिक मुंबईकर प्रवाशांनी सुलभ अशा डिजिटल प्रवासाचा लाभ घ्यावा, या उद्देशाने ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑफर कशी मिळवाल
बेस्ट ‘चलो ॲप’ डाऊनलोड करून बस पास सेक्शनमध्ये जाऊन ‘दसरा ऑफर’ निवडून तपशील भरून १९ रुपये ऑनलाईन भरून ही ऑफर खरेदी करू शकता. बसमध्ये चढल्यावर ‘स्टार्ट अ ट्रिप’वर टॅप करून मोबाईल फोन बसवाहकाच्या मशीनसमोर धरून तिकीट वैध करावे. त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी डिजिटल पावती अँपवर मिळेल. संपूर्ण प्रक्रिया रोख रक्कमविरहित आणि कागदविरहित असेल. ही योजना २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये उपलब्ध आहे.

योजनेचे लाभ
या योजनेद्वारे कोणत्याही बस मार्गावर ९ दिवसांच्या कालावधीदरम्यान विमानतळ, हॉप ऑन-टॉप ऑफ अशा विशेष बससेवा वगळता वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसगाड्यांद्वारे प्रवास करता येऊ शकतो.

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.