मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.
या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
(Also Read :नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्वरवासियांचा इशारा)
अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.
सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता
परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता
मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे
मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये
(Also Read > कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)
वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.
ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Vision Abroad