सिंधुदुर्ग: गेली बारा वर्षे शिक्षक भरती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारहून अधिक डिएड उमेदवारांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे.
शालेय शिक्षणमंत्रीपद हे आता जिल्ह्यात आहे. त्यामुळे आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून त्यांना आशेचा एक किरण भेटला आहे. पण बहुतेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत नाही असल्याने त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा बद्दल विचार न केल्यास ते आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याच्या पावित्र्यात आहेत.
शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू केले. पण ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील स्थानिक डीएड उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याच्या हेतून जिल्ह्यातील अनेक तरुणांनी डीएड पदवी मिळविली. यानंतर त्यांना शिक्षक भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्यास सुरवात केल्याने तसेच ही परिक्षा जे उत्तीर्ण होतील, त्यांचीच भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक डीएड उमेदवार हे भरतीपासून वंचित राहिले आहेत
Vision Abroad