सिंधुदुर्ग: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिरपरिसरात मोबाईल नेटवर्क ची समस्या येत होती. ह्या परिसरात कोणत्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क पकडत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ह्या समस्येवर आता उपाय योजना करण्यात आली आहे.
(Also Read > सिंधुदुर्ग जिल्हा हवाईमार्गाने हैद्राबाद व म्हैसूर शहरांशी जोडला जाणार.. जाणून घ्या वेळापत्रक आणि प्रवासभाडे )
या परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मालवण तालुक्या तील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेलीअनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल जत्रेच्या दरम्यान उपलब्ध राहणार आहेत.
