नवी दिल्ली |औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव आता धाराशीव करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. केंद्राच्या मंजुरीमुळे आता ही नवीन नावे सर्व ठिकाणी वापरण्यात आता कोणतेच बंधन राहिले नाही आहे.
नामांतर संबधि आजपर्यंतचा इतिहास..
1995 मध्ये औरंगाबाद महापालिका सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव माडंला, या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. पण या निर्णयाला तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिलं, यावर कोर्टात सुनावणी सुरु असातनाच राज्यात आघाडी सरकार सत्तेत आलं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगरची अधिसूचना मागे घेतली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाली.
महाविकास आघाडी सरकार अडचणीत असताना 29 जून 2022 ला तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळावे औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर मविआ सरकार कोसळलं आणि भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी मविआ सरकारने केलेला नामांतराचा ठराव रद्द केला. पण दोन दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संभाजीनगर आणि धावाशिव नामांतराला मंजूर दिली.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी…
■ औरंगाबादचे #छत्रपती_संभाजीनगर.
■ उस्मानाबादचे #धाराशिव…
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचे मनःपूर्वक आभार…#ChhatrapatiSambhajinagar #Dharashiv@narendramodi @AmitShah pic.twitter.com/AUjxriw3eh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 24, 2023
Vision Abroad