अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या निधी वाटपात कोकणाला दुजाभाव का? जनआक्रोश समितीचा सवाल…

Mumbai Goa Highway News | रुपेश दर्गे| एखादा अपघात घडतो त्यावेळेस मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहिर करण्यात येते तर जखमीवर मोफत उपचार करण्यात येतात यावर आमचा काहीही आक्षेप नाही कारण एखाद्याच्या घरचा कर्ता कमावता जातो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला आधार देण गरजेचं आहे.

पण हे आधार कोकणाच्या बाबतीत कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत. एकाच दिवशी दिनांक- १९.०१.२०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील रेपोली येथे अपघात होऊन १० कोकणकरांना आपला प्राण गमवावा लागला तर सिंधुदुर्गमध्ये बस अपघातात ०२ कोकणकरांचा प्राण गेला. सरकारच्यावतीने अद्यापही त्यांना ना कोणती मदत जाहीर करण्यात आली ना कोणते भाष्य करण्यात आले. यानंतर एक ना अनेक अपघात सतत मुंबई गोवा महामार्गांवर घडत आहेत परंतू शासन मदत म्हणून कोकणाला वाट्याला देताना दिसत नाहीत याउलट आपलीच चुकी दाखविण्यात दंग होऊन जातात.

काही दिवसांपूर्वी तावडे कुटुंब या अपघाताचे बळी ठरले परंतु शासनाने त्यांना देखील मदत जाहीर केली नाही.

शनिवारी सुखेळी खिंड येथे पहाटे झालेल्या अपघातात ०२ जखमी झाले शासनाने यांच्यावर मोफत उपचार करण्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही.

योग्य दिशादर्शक फलक नसल्याने आज दिनांक-१८.०४.२०२३ रोजी माणगाव इंदापूर हद्दीत अपघात घडला यामध्ये एका तरुणाला आपला प्राण गमवावा लागला तर दोघेजण जखमी आहेत.

याआधी ज्यांना मदत जाहिर केलेली आहे ती अद्याप पोहचलेली नाही.

हे सर्व प्रकार कोकणाला कुठेतरी दुजाभावा देताना दिसत आहेत.एकतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सरकार जलदगतीने पूर्ण करताना दिसत नाही.ठेकेदार कामचुकार करून अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालून राजकीय आशीर्वादाने कोकणाच्या पदरी निराशा येत आहे.

सरकारी चुकीमुळेच होत असलेल्या अपघाताची जबाबदारी देखील घ्यायला तयार नाहीत.

रुपेश दर्गे

जनआक्रोश समिती

 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search