Mansoon Updates |भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे.
हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे.
कोकणात मान्सूनचे आगमन ९ जूनला होणार आहे. कोल्हापूर सातारा जिल्हय़ात याचवेळी तो पोचणार असला तरी तिथे जोर कमी राहणार आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मान्सून १६ जूनपासून आगमन करणार आहे. तसेच याच कालावधीत तो देशातील उत्तर भागात पोहोचणार आहे.
शुक्रवारचा पाऊस मान्सून नव्हे
शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
सध्या कुठे आहे मान्सून
सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.
25 May 2023, The extended range forecast for coming 4 weeks for all India rainfall by IMD. pic.twitter.com/505KP0sGa2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2023
Vision Abroad
Vision Abroad