“Train Cancelled” | मध्य रेल्वेने चाकरमान्यांची मांडलेली थट्टा…

Kokan Raiway | गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जायचे आहे, नियमित गाड्यांची तिकिटे अवघ्या 1 मिनिटांत बूक झाल्याने भेटली नाहीत म्हणुन रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे तरी आरक्षण भेटेल या आशेने प्रयत्न करणार्‍या गणेश भाविकांची रेल्वे प्रशासनाने चक्क थट्टा मांडली असल्याचे दिसत आहे.

गणेशोत्सवासाठी 204 अतिरिक्‍त गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या गाड्यांच्या आरक्षणावेळी प्रवाशांना विचित्र अनुभव मिळताना दिसत आहे. ईतर गाड्यांच्या आरक्षणा सारखे या गाड्यांचे आरक्षणही सकाळी ८ वाजता रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेब पोर्टल वर सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र जे प्रवासी ऑनलाईन तिकीट बूकिंग करत आहेत त्यांना या गाड्यांचे स्टेटस पाहिल्या 15 मिनिटांसाठी ‘Train Cancelled’ असे दाखवते आणि त्यानंतर बूकिंग चालू होते तेव्हा आरक्षणाचे स्टेटस वेटिंग लिस्ट पर्यंत दाखवते. फक्त एका दोघांना हा अनुभव आला असे नाही तर बहुतेक प्रवाशांना असा अनुभव आला आहे. अनेक तक्रारी सोशल मीडिया मार्फत केल्याचे दिसून येत आहे.

हा नेमका प्रकार काय आहे या साठी काही जणांनी सोशल मीडिया आणि ऑनलाईन तक्रार नोंदवून याबाबत जाब विचारला होता. रेल्वेने औपचारिकता म्हणुन या तक्रारीला उत्तरे दिली असून त्याला कोणताही आधार नाही आहे. मध्यरेल्वेने एका प्रवाशाच्या ट्विटर वरील तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे.

प्रश्न ……….
आज सकाळी IRCTC एप्लिकेशनवर आरक्षण सुरू झालेल्या विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०११६५ समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे दाखवले. त्यानंतर अचानक आरक्षण सुरु होताच उपलब्ध तिकीटे दिसण्याऐवजी अवघ्या १० सेकंदात १७१ प्रतीक्षा यादीच दिसू लागली.
असं कसं होऊ शकतं ?

उत्तर……….
511 passengers booked online tickets& 1013 booked PRS tickets from 08.00 hrs to 08.05 hrs, in first 5 minutes

511 online tickets booked in first 5 minutes, since train shown online. So question of train cancel does not arise. For those having problem might some technical issue.

मध्यरेल्वेच्या म्हणण्यानुसार 01165 या गाडीचे 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दिवसांचे आरक्षण सकाळी 08:00 ते 08:05 या काळात ऑनलाईन 511 सीट्स तर पीआरएस काऊंटरवर 1013 एवढ्या सीट्सचे आरक्षण झाले. त्यामुळे ‘Train Cancelled’ असण्याचा प्रश्नच येत नाही. हा फक्त तुमच्या बाजूने काही तांत्रिक इश्यू असेल.

मध्य रेल्वेच्या या उत्तराने समाधान तर सोडाच अजून प्रश्न निर्माण झाले आहेत.

जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता तर बरोबर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या याच अतिरिक्त गाड्यांच्या आरक्षणावेळी का घडत आहे?

टेक्निकल इश्यू तंतोतंत 15 मिनिट कसा काय असू शकतो?अगदी सोळाव्या मिनिटाच्या पाहिल्या सेकंदात ”Train Cancelled” हे स्टेटस गायब होऊन आरक्षण चालू कसे झाले?

जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता सर्व्हर स्लो झाले असते, युझरला बाहेर फेकले असते.  मात्र येथे क्लीअर ”Train Cancelled” असे का दाखवले गेले?

पाहिल्या 5 मिनीटांत 511 तिकिटे आरक्षित झालीत. पुढील 10 मिनीटांत यापेक्षा दुप्पट/तिप्पट तिकीटे बूक झालीत ती दलालांच्या घशात गेलीत का?

या रेल्वे तिकीट आरक्षणातही दलालांनी रेल्वेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार केला असल्याचा आरोप चाकरमान्यांकडून होत असून या प्रकारची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search