Vande Bharat Express :निळ्या आणि पांढर्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेसला आता नवीन लूक मिळणार आहे. यापुढे निर्मिती होणार्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाच्या असणार आहेत.
सध्या असलेला पांढरा रंग धूळ चिटकून खराब होत असल्याने लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला वारंवार धुवून साफ करावे लागत आहे. हे जरा जास्त गैरसोयीचे होत असल्याने त्याला पर्यायी दुसरा कोणता रंग देता येईल याबद्दल ईतर रंगाचे पर्याय शोधले जात आहेत. सध्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाचा पर्याय विचाराधीन असून एका गाडीला प्रायोगिक तत्त्वावर हा रंग दिला आहे. या रंगाना हिरवा झेंडा भेटल्यास भविष्यात सर्वच वंदे भारत एक्सप्रेस भगव्या आणि राखाडी रंगाच्या दिसणार आहेत. या बदला बरोबरच प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आसनव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहेत.
भगवा रंग देशाच्या झेंड्याच्या रंगातून घेतला आहे असे केंदीय रेल्वे मंत्री आदित्य वैष्णव म्हणाले आहेत. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तर राखाडी रंग आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणुन हे दोन्ही रंग या एक्सप्रेस गाडीसाठी निवडण्यात आले आहेत.
Inspected Vande Bharat train production at ICF, Chennai. pic.twitter.com/9RXmL5q9zR
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 8, 2023
Vision Abroad