
मुंबई : दहावी पुरवणी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळणार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. आता हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Local : हार्बरवर लोकलसेवा ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे पनवेल-सीएसएमटी अप-डाऊन दोन्ही बंद
महाराष्ट्र
कोकण रेल्वे बेळगावला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू; बेळगाव,चंदगड,आंबोलीसह एकूण 9 स्थानकांची निश्चिती
महाराष्ट्र
महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाला स्थान मिळणार; वाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्या...
महाराष्ट्र