कोकण रेल्वेचा ३३ वा स्थापना दिवस : अशी आहे कोकण रेल्वेची वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी

रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागातउल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित भ करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने गेल्या १२-१८ महिन्यांत मिळवलेल्या कामगिरीची माहिती खालीलप्रमाणे दिली

 

माननीय पंतप्रधानांनी 27 जून 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोवा – मुंबई CSMT वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
26 मार्च 2023 रोजी माननीय रेल्वेमंत्र्यांनी नव्याने पूर्ण झालेल्या प्रतिष्ठित चिनाब पुलाची पाहणी केली.
जुलै 2023 मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत योजनेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले आहे.
कोकण रेल्वेने खालील क्षेत्रात आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे.
  • आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ₹962.43 कोटी
  • आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ₹736.47 कोटी
  • आतापर्यंतचा सर्वाधिक प्रकल्प महसूल – ₹3274. 70 कोटी
  • आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ₹५१५२.२३ कोटी
  • आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा – ₹२७८.९३ कोटी
  • रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेज आणि एकात्मिक पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी महाप्रीटसोबत करार करण्यात आला.
  • मे 2023 मध्ये, BSNL सोबत एक करार करण्यात आला, ज्या अंतर्गत BSNL ने 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जी फायबर ऑप्टिक लाईनच्या नूतनीकरणासाठी राखून ठेवली जात आहे.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search