Konkan Railway News : दिवाळी आणि ख्रिसमससाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दिवाळी आणि ख्रिसमस साठी एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी विशेष (अतिरिक्त) तिकीट भाड्यासहित चालविण्यात येणार आहे.
Train No. 09057 / 09058 Udhna Jn. – Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi- Weekly Special on Special Fare:
Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Weekly Special
ही गाडी दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शुक्रवारी आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. उधाणा येथून सायंकाळी १९:४५ वाजता सुटून ही गाडी दुसर्या दिवशी मंगळरू येथे संध्याकाळी १९:१० या वेळेस पोहचेल.
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Weekly Special
ही गाडी दि. ४ नोव्हेंबर २०२३ ते ०१ जानेवारी २०२४ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि सोमवारी चालविण्यात येणार आहे. मंगुळुरु येथून रात्री २१:१० वाजता सुटून ही गाडी दुसर्या दिवशी उधाणा येथे रात्री २१:३० या वेळेस पोहचेल.
ही गाडी खालील स्थानकांवर थांबेल
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला ,गोकर्णा रोड,कुमता, होन्नावर, मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
2 Tier AC – 01 Coach, 3 Tier AC – 03 Coaches, Sleeper – 12 Coaches, Second Seating – 04 Coaches , SLR – 02. एकूण 22 डबे
Facebook Comments Box
Vision Abroad