प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! सीएसएमटी स्थानकावर ३ दिवस मेगाब्लॉक; कोकणरेल्वेच्या दोन एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम

Megablock on Central Railway :छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वे कडून १९,२० आणि २१ च्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक मुळे काही  एक्सप्रेस च्या सेवा दादर स्थानकापर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत.तसेच या ब्लॉक दरम्यान मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. सीएसएमटी येथून कासाराकडे जाणारी रात्री १२:१४ वाजताची लोकल शेवटची असेल.
एक्सप्रेस गाड्या दादरपर्यतच
या ब्लॉक मुळे काही गाड्यांची सेवा दादर स्थानापर्यंतच स्थगित करण्यात आली आहे. या गाड्यांत १२०५२ मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२१२० मडगाव सीएसएमटी  तेजस एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्या दिनांक  १९,२० आणि २१ एप्रिल रोजी दादरपर्यंच चालविण्यात येणार आहेत.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search