मुंबई: पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या मुंबई गोवा महामार्गाच्या (NH 66) 84.6 किलोमीटरच्या भागावर सुमारे 490 कोटी रुपये एवढी रक्कम खर्च केली असल्याची माहिती ‘माहिती अधिकारातून’ (RTI) समोर आली आहे. संतापाची गोष्ट म्हणजे इतकी रक्कम खर्च करूनही रस्त्याचे काम अपूर्ण आहे तर पूर्ण झालेल्या रस्त्यातही खड्डे पडले आहेत.
माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचा वापर करून केरळमधील कार्यकर्ते के गोविंदन नामपूथीरी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या नवीन रस्ता तयार करण्यासाठी 316.35 कोटी खर्च केले आहेत आणि दुरुस्ती आणि देखभालीवर 173 रुपये कोटी एवढे असे एकूण 490 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
7 एप्रिल रोजी जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसह महामार्गावर गाडी चालवली तेव्हा या महामार्गाच्या स्थितीमुळे नामपूथीरी हैराण झाले होते आणि तेव्हाच त्यांनी या समस्येच्या मुळावर जायचा विचार केला.
“मी महामार्गाच्या या अवस्थेसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) संपर्क साधला, रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे, सुरक्षा उपाय, पथदिवे इ.ची बसवण्याची विनंती केली,” असे नामपूथीरी म्हणाले
NHRC ला लिहिलेल्या पत्रात, नामपूथीरीनी महामार्गावरील सुरक्षिततेच्या समस्यांवर प्रकाश टाकला, ज्यात योग्य पथदिवे नसल्याचा समावेश आहे. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर गतिरोधक आणि रेलिंग बसवण्याची सूचनाही त्यांनी केली. माहिती अधिकारात त्यांनी या प्रश्नांची उत्तरे मागितली, परंतु एनएचएआयने केवळ डिसेंबर 2024 पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असे तोडके उत्तर दिले आहे.
Facebook Comments Box