मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.
Vision Abroad